नंदुरबार जिल्ह्यात महायुतीत फूट

नंदुरबार जिल्ह्यात महायुतीत फूट
  • MG News
  • ऑगस्ट 2 2025

Share on  

भाजप आमदार डॉ विजय कुमार गावित यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा  स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहे. युतीमधील घटक पक्ष नेहमी भाजप विरोधी भूमिका घेत असतात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षाला पाठिंबा दिल्यामुळे भाजपाला लोकसभा सीट गमवावी लागली. त्यामुळे स्थानिक स्वराज संस्था निवडणूक स्वबळावर लढणार असे डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अक्कलकुवा येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते मेळाव्यात सांगितले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. विजयकुमार गावित हे नंदुरबार जिल्ह्याचे दीर्घकालीन राजकीय व प्रभावशाली नेते आहेत. त्यांची स्वीकारलेली विरोधी भूमिका भाजपला लाभदायी ठरेल. घटक पक्षांची भूमिका लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधात जाण्यामुळे जागा गमवावी लागल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. डॉ गावित यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या स्थानिक नेत्यांना सांगितल्यावर सुद्धा यांनी विरोधी भूमिका घेतली. घटक पक्षांचे विरोधी धोरणामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये लढत गमवावी लागली. म्हणून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे सांगत  स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचे संकेत भाजप आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी दिले. डॉ विजयकुमार गावित यांच्या या निर्णयामुळे महायुतीत अजून तणावाचे वातावरण निर्माण होण्याचे संकेत दिसत आहे.

संबंधित बातम्या