धुळे शहरात सध्या एस.टी महामंडळाचे चार्जिंग केबल टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. धुळे शहरात असलेल्या कमलाबाई शाळा ते जिजामाता परिसरात या केबल टाकण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे. आणि हे सर्व नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या जीवाला धोकादायक ठरत आहे. कमलाबाई शाळेसमोरच चार्जिंग केबल टाकण्यासाठी खड्डे खोदल्याने या ठिकाणी वाहतुकीचा देखील प्रश्न गंभीर झाला आहे.
तसेच या संदर्भात या परिसरात असलेल्या व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस अथवा सूचना न देता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केबल टाकण्यासाठी खड्डे करण्यात आले आहेत. तसेच हे काम सुरू असताना कुठल्याही प्रकारची सुरक्षेचा उपाय या ठिकाणी संबंधित कॉन्ट्रॅक्टर कडून करण्यात आली नसल्याचे आरोप करीत संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात यावी, हि मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.