नाशिक ते राजस्थान स्वतंत्र रेल्वे सुरु करा ; राजस्थान हरियाणा गुजरात प्रवासी संघाकडून खासदार राजाभाऊ वाजे यांना निवेदन

नाशिक ते राजस्थान स्वतंत्र रेल्वे सुरु करा ; राजस्थान हरियाणा गुजरात प्रवासी संघाकडून खासदार राजाभाऊ वाजे यांना निवेदन
  • MG News
  • जानेवारी 9 2025

Share on  

नाशिक ते राजस्थान स्वतंत्र रेल्वे सुरु करा ; राजस्थान हरियाणा गुजरात प्रवासी संघाकडून खासदार राजाभाऊ वाजे यांना निवेदन


नाशिक : नाशिकवरून राजस्थानला जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करा अशी मागणी राजस्थान हरियाणा गुजरात प्रवासी संघाकडून खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत संघटनेच्या वतीने खासदार राजाभाऊ वाजे यांना निवेदन दिले आहे. यावेळी राजस्थान हरियाणा गुजरात प्रवासी संघाचे तेजपाल सिंह सोढा, महेंद्र सिंह राजपूत, अनिल कौशिक प्रेम सिंह राठौड़, सज्जन सिंह राजपुरोहित यांच्यासह संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संघटनेच्या वतीने देण्यात तेजपाल सिंग सोढा म्हणाले की, नाशिक ही कुंभ नगरी असून धार्मिक पर्यटनासाठी राजस्थान येथून हजारो भाविक नाशिकमध्ये येत असतात मात्र नाशिक हून राजस्थान ला जाण्या येण्यासाठी स्वतंत्र रेल्वे नसल्याने प्रवाशी वर्गाचे प्रचंड हाल होतात. नाशिक शहर आणि जिल्ह्यात सुमारे ८ लाख राहतात तरी देखील ट्रेन नसल्याने नाशिक ते राजस्थान अशी स्वतंत्र रेल्वे असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

याप्रसंगी राजस्थान येथील जिल्ह्यात एवढ्या संख्येने नागरिक असताना स्वतंत्र रेल्वे नसल्याने राजाभाऊ वाजे यांनी दुःख व्यक्त केले. तसेच राजस्थान ते नाशिक स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याबाबत आपण शासनाकडे पाठपुरावा करून राजस्थान नाशिक कनेक्टिव्हिटीसाठी रेल्वे सुरू करू असे आश्वासन प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

संबंधित बातम्या