मुंबईच्या विलेपार्ले या उपनगरात असलेल्या साठ्ये महाविद्याल्याच्या इमारतीवरून उडी मारून विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आले आहे. संध्यापाठक असे आत्महत्या केलेल्या विद्यर्थिनीचे नाव असून ती महाविद्यालयांत अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होती. महाविद्यालय प्रशासनाने संध्याने आत्महत्या केली नसून ती तिसऱ्या मजल्यावरुन चालताना काही कारणाने खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला, असे सांगितले आहे मात्र संध्याने आत्महत्या केल्याची चर्चा महाविद्यालयात सुरु आहे मात्र, संध्याच्या कुटुंबीयांनी याबाबत संशय व्यक्त केला आहे. तिला कोणीतरी ढकलेले असावे, असे संध्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. संध्या खाली पडताच तिला तातडीने बाबासाहेब गावडे चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.या घटनेनंतर पोलिसांनी महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये संध्या कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कॉरिडोअरमधून चालत जाताना दिसत आहे. संध्या पाठक हिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास सध्या विलेपार्ले पोलिसांकडून सुरु आहे.