नागपूरच्या विधान भवनात विद्यार्थ्यांनी केलं ‘संसद युथ पार्लमेंट’चं आयोजन

 नागपूरच्या विधान भवनात विद्यार्थ्यांनी केलं ‘संसद युथ पार्लमेंट’चं आयोजन
  • MG News
  • जुलै 31 2025

Share on  

 नागपूरच्या विधान भवनात विद्यार्थ्यांनी ‘संसद युथ पार्लमेंट’चं आयोजन केलं. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या विद्यार्थ्यांना विधान भवनात हे आयोजन करण्यासाठी परवानगी दिली होती.

देशभरातून तब्बल १५० विद्यार्थी ‘संसद युथ पार्लमेंट’मध्ये सहभागी होण्यासाठी नागपूरला आले होते. विधान भवनासोबतच आमदार निवास सुद्धा या विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता.

नागपूरच्या विधान भवनात हिवाळी अधिवेशनाव्यतिरिक्त राष्ट्रकुल संसदीय मंडळ आणि संसदीय अभ्यासवर्गाच्या माध्यमातून कायदेमंडळाची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवले जावेत, यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहे.

या उपक्रमाअंतर्गत अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नाला विधानसभाध्यक्षांनी परवानगी दिल्यानंतर ‘युथ पार्लमेंट’चं आयोजन करण्यात आलं. मंत्री आणि आमदारांच्या जागांवर बसून या विद्यार्थ्यांनी दोन दिवस युवा संसदेचा अनुभव घेतला.

संबंधित बातम्या