सिटीचौक पोलिसांची यशस्वी कारवाई; मोटारसायकल चोरट्याला अटक

सिटीचौक पोलिसांची यशस्वी कारवाई; मोटारसायकल चोरट्याला अटक
  • MG News
  • जुलै 26 2025

Share on  

सिटीचौक पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने चोख खबरदारी घेत चार चोरीच्या मोटारसायकलींसह एक सराईत चोरटा सिल्लोड येथून अटक केला आहे. सदर प्रकरणात अंदाजे २,४०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामध्ये विविध कंपनींच्या मोटारसायकलींचा समावेश आहे.
     पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. मुनिर पठाण, पोहवा पन्नुसिंग वहरे, विनोद नितनवरे, पोआ. मनोहर त्रिभुवन यांच्या पथकाने ही कामगिरी केली. गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ सिल्लोड येथे धाड टाकली. जामा मस्जिद परिसरात शोध घेत असताना एका संशयित गाडीसह आरोपी सद्दाम शेख इसाक बागवान (वय ३२, रा. सिल्लोड) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चौकशीदरम्यान त्याने साथीदार शेख रईस (रा. नारेगाव, सध्या मेवात, हरियाणा) याच्यासह छत्रपती संभाजीनगर शहरातून विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
     या प्रकरणात काही मोटारसायकली सिडको व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक संगीता राजपूत, मुनीर पठाण करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली आहे. 

संबंधित बातम्या