हदगाव तालुक्यात ऊस या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. परंतु यावर्षी ऊस पिकावर पांढरी माशी, लाल रोग व तांबा मावा या रोगाची लागण झाली असल्याने ऊस पिकांची वाढ खुटली असुन ऊसाचे पिक जीर्ण होऊन पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे तातडीने पंचनामे करून पिडीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी शेतकरी यांच्या कडून होत आहे.