कावनई सोसायटी चेअरमनपदी सुनील शिरसाठ तर व्हाईस चेअरमनपदी कलाबाई शिरसाठ बिनविरोध
इगतपुरी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कावनई विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच पार पडली संस्थेच्या जेष्ठ नेते व घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शिवाजी शिरसाठ यांच्या नेतृत्वखाली ही निवड पार पडली आहे. चेअरमन पदी सुनील कचरू शिरसाठ तर व्हाईस चेअरमन पदी कलाबाई गणपत शिरसाठ यांची बिनविरोध निवड करण्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नाली शिंदे यांनी अधिकृत पणे केली आहे. संस्थेच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत चेअरमन शरद शिरसाठ व माजी व्हाईस चेअरमन राजाराम शेलार यांनी आवर्तन पद्धतीने राजीनाम दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदानसाठी ही निवड घेण्यात आली असून चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी विहित वेळेत प्रत्येकी एक एक अर्ज आला होता यामध्ये चेअरमन पदासाठी सुनील शिरसाठ यांचा एकमेव अर्ज आला तर व्हाईस चेअरमन पदासाठी कलाबाई शिरसाठ यांचा एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध घोषित करण्यात आली आहे.
यावेळी सभागृहात माजी चेअरमन खंडेराव पाटील, रामभाऊ पाटील, संदीप शिरसाठ, खंडेराव पाटील, जगण पाटील, संतोष दोंदे, मुक्ताबाई शिरसाठ, नंदू पाडेकर, मुक्ताबाई शिरसाठ हे सभासद उपस्थित होते. सहायक आधीकरी म्हणून पी एस राऊत यांनी काम पहिले.
नवनिर्वचित पदाधिककारी यांचा ग्रामस्थ प्रकाश शिरसाठ, दिगम्बर शिरसाठ, संदीप दोंदे, रवी पाडेकर, रामचंद्र शिरसाठ, गणेश पाटील, दीपक शिरसाठ, पोपट पाडेकर, गणेश शिरसाठ यांनी या निवडीचे अभिनंदन केले.
जिल्ह्याचे सहकार नेते नेते अँड संदीप गुळवे यांच्या मार्गदर्शनखाली कावनई विविध कार्यकारी सोसायटी ची निवड अत्यन्त खेळीमेळीच्या वातावरणात पार पडत असते. प्रत्येक सभासदाला काम करण्याची संधी देण्यात यावी या दृष्टीने आवर्तन पद्धतीने चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी ग्रामस्थ संधी देत असतात.
शिवाजी शिरसाठ (उपसभापती घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती )