नाशिकमध्ये निविदा भ्रष्टाचार; 'पीडब्ल्यू़डी'चे अभियंते कमावतात खोऱ्याने पैसे?

नाशिकमध्ये निविदा भ्रष्टाचार; 'पीडब्ल्यू़डी'चे अभियंते कमावतात खोऱ्याने पैसे?
  • MG News
  • सप्टेंबर 16 2025

Share on  

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. येथील अभियंता औटी यांच्या विरोधात थेट तक्रारी आहेत. अभियंता औटी हे फावडे घेऊनच बसले आहेत, असे आव्हाड म्हणाले.
नाशिकमध्ये मोठे कॉन्ट्रॅक्टर लहान कॉन्ट्रॅक्टरना दाबण्यासाठी गैरप्रकार करतात. मोठे कंत्राटदार टेंडर मॅनेज करण्यासाठी लहान कंत्राटदारांना उचलून आणि अगदी मारहाण करण्यापर्यंत जात आहेत याबाबत पोलिसांमध्ये तक्रार देखील झाली आहे. माझ्याकडे देखील एक तक्रार आहे.

गंभीर प्रकरण असूनही याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याचे माझ्यापर्यंत आले. सिंहस्थ कुंभमेळ्याचे काम सांगून अनेक गैरप्रकार सुरू आहेत. हा सर्व भक्तांचा पैसा लुबाडण्याचा प्रकार आहे. सरकारच्या पैशावर सर्रास दरोडा टाकला जात असताना शासन गप्प का?

निविदा मॅनेज करून सार्वजनिक बांधकाम विभाग भ्रष्टाचार करीत आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे देखील सगळ्यांना माहित आहेत. सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यात लक्ष घालून कारवाई करणे अपेक्षित आहे, अशी अपेक्षा आव्हाड यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या