मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड वर आज सकाळी पवई आयआयटीजवळ एक भीषण अपघात घडला. बेस्ट बसने दोन तरुणांना चिरडल्याची गंभीर घटना समोर आली असून यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
मृत झालेल्या व्यक्तीचे नाव देवांश पटेल (वय २२, रा. जोगेश्वरी) असे असून, जखमी युवकाचे नाव स्वप्नील विश्वकर्मा (वय २२) असे आहे. स्वप्नील याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दोन्ही तरुण लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन परतत असताना अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.