ठाणे : तलावांचे शहर नाव बदलून कचऱ्याचे आणि डबक्यांचे शहर करा - राजन विचारे

ठाणे : तलावांचे शहर नाव बदलून कचऱ्याचे आणि डबक्यांचे शहर करा - राजन विचारे
  • MG News
  • मे 24 2025

Share on  

ठाणे : तलावांचे शहर नाव बदलून कचऱ्याचे आणि डबक्यांचे शहर करा - राजन विचारे  

        तलावांचे शहर नाव बदलून कचऱ्याचे आणि डबक्यांचे शहर असं नामकरण करा, असा टोला माजी खासदार राजन विचारे यांनी पालिका अधिकाऱ्यांना लगावला. ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समवेत राजन विचारे यांनी आज पहिला टप्यातील ठाणे शहराचा दौरा केला. यावेळी नाल्याचा, रस्त्याची आणि तलावांची दुरावस्था पाहून विचारे यांनी पालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
      पावसाळ्यापूर्वी झालेली नालेसफाई व तलावांची झालेल्या दुरावस्थेबाबत राजन विचारे यांनी पोलखोल केली. त्यानंतर ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर संयुक्त दौरा केला. या दौऱ्याची सुरुवात मासुंदा तलाव येथून करण्यात आली. यामध्ये तलावाच्या आउटलेटची कामे निधी अभावी अपूर्ण स्थितीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पावसाचे पाणी बाजारपेठ मध्ये जाऊन दरवर्षी व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली. तसेच वंदना डेपो येथील पारस सोसायटी समोरील नाला कचऱ्यानी तुंडूब भरलेला दाखवत ठेकेदार कशी हात की सफाई करतो याचं उदाहरण त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या दाखवून दिले. या पाहणी दौऱ्यात ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान , उपनगर अभियंता सुधीर गायकवाड,कार्यकारी अभियंता मोहन कलाल ,भगवान शिंदे, वैभव तपकिरी ,चंद्रकांत सावंत, स्वच्छता निरीक्षक अधिकारी व इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या