ठाणे : विकास सगळ्यांना पाहिजे पण नगरसेवक दुसऱ्या पक्षात जाणं ही पळवा पळवी झाली - सुहास देसाई

ठाणे : विकास सगळ्यांना पाहिजे पण नगरसेवक दुसऱ्या पक्षात जाणं ही पळवा पळवी झाली - सुहास देसाई
  • MG News
  • मे 12 2025

Share on  

ठाणे : विकास सगळ्यांना पाहिजे पण नगरसेवक दुसऱ्या पक्षात जाणं ही पळवा पळवी झाली - सुहास देसाई 

       कळवा - मुंब्रा मतदार संघातून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या जवळचे मानले जाणारे सात ते आठ माजी नगरसेवक यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पाहता शरद पवार गटात खिंडार पडल्याचे चित्र कळवा मध्ये दिसून येत आहे. येणाऱ्या काळात आणखी पक्षप्रवेश होणार होणार असल्याचं शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे. तर याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी फार महत्व दिले नाही. विकासाच्या मुद्द्यावरती हे सर्व नगरसेवक शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करत असल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे. मात्र दुसरीकडे अशी कोणती जादूची कांडी आहे की जेणेकरून क्लस्टर योजना हे लवकर लवकर त्या भागात राबवली जाणार आहे त्यामुळे त्या भागात विकास होणार आहे. विकास कोणाला नाही पाहिजे. मात्र ही पळवा पळवी आहे असे शरद पवार गटाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी आपलं मत व्यक्त केले. त्यामुळे येणाऱ्या आगामी निवडणुका पाहता माजी नगरसेवक विकासाच्या मुद्द्यासाठी आणि निधीसाठी कोणत्या पक्षात जाणार हे पाहणे गरजेचे राहणार आहे.

संबंधित बातम्या