ठाणे पोलिसांनी केली सलमान खान या सोनसाखळी चोरट्याला अटक.

ठाणे पोलिसांनी केली सलमान खान या सोनसाखळी चोरट्याला अटक.
  • MG News
  • एप्रिल 29 2025

Share on  

ठाणे पोलिसांनी केली सलमान खान या सोनसाखळी चोरट्याला अटक. 

 ठाणे-एका रात्रीत ०४ महिलांच्या गळयातील सोनसाखळी चोरी करणाऱ्या सलमान फिरोज खान (२५) या सराईत चोरट्यास ठाणे शहर पोलिसांनी राजस्थान,अजमेर येथून अटक केली. तसेच ०९ गुन्हे उघडकीस आणताना एकूण १०० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश आले. तर सलमान याच्यावर यापूर्वी मुंबईत चार गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
       ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ११ एप्रिल २०२५ रोजी नौपाडा, राबोडी, वर्तक नगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री ०४ महिलांच्या गळयातील सोनसाखळी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास करताना अटकेतील सलमान खान हा या गुन्ह्यानंतर राजस्थान अजमेर येथे पळून गेला होता. अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसारच त्याला अजमेर येथून २३ एप्रिल २०२५ रोजी अटक केली. तसेच वर्तकनगर, राबोडी, नौपाडा, कापूरबावडी, कासारवडवली, डोंबिवली आणि नारपोली या पोलीस ठाण्यातील ०९ गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील १०० ग्रॅम वजनाचे १० लाखांचे ०५ मणी मंगळसुत्रे व ०५ सोन्याच्या चैन आणि  ८० हजारांची गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल असा एकुण १० लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच त्याला ३० एप्रिल २०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने केली.

अमरसिंह जाधव, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, ठाणे.

संबंधित बातम्या