ही फक्त सुरवात आहे, माझा खेळ हा सुरू राहील. गेम हा रॅपिड असल्यानं वेळ फार कमी होता, गेम संपत असताना जिंकले अस कळलं. गेम जिंकल्याच कळताच डोळ्यात अश्रू आले, आईला शोधत होते असे दिव्या देशमुख म्हणाली. तसेच, मला हम्पीचा आदर आहे. पहिल्या खेळात माझ्या चुका झाल्यामुळे तिचा विजय होता पण नंतर माझ्यावर खूप दबाव आला. प्रेशर खेळाच आहे, किती लोकांचं प्रेशर आहे याचा मला फरक पडत नाही.
मी आज कुठल्या स्टेजवर आहे, मी वयाच्या पाचव्या वर्षी चेस खेळायला सुरू केलं.
खेळाच्या चांगल्या प्रदर्शनासाठी आर्थिक परिस्थिती, असलेलं पाठबळ या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात असेही दिव्या देशमुख म्हणाली.