जालन्यातील मंठा तालुक्यातील देवठाणा गावाजवळील पुल मुसळधार पावसात वाहून गेला आहे. या घटनेमुळे कानडी गावाचा संपर्क तुटलाय. पूल वाहून गेल्यानं गावकऱ्यांनी पुलांचं काम निकृष्ठ दर्जाचं झाल्याचा आरोप केलाय.
चार दिवसांपासून या भागात पावसानं दमदार हजेरी लावल्याने नदीला आलेल्या पुरामुळे हा पूल वाहून गेलाय. परिणामी नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळतोय.