अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले धरण भरले; मुळा नदीवरील आंबित धरण ओव्हर फ्लो

 अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले धरण भरले; मुळा नदीवरील आंबित धरण ओव्हर फ्लो
  • MG News
  • मे 29 2025

Share on  

 

अकोले तालुक्यातील मुळापाणलोट क्षेत्रात पावसाची गेल्या आठ दिवसापासून मान्सून पूर्व पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे मुळा नदी वाहती झाली असून या नदीवरील आंबित धरण ओव्हर फ्लो झाले आहे. मुळा नदीच्या उगमा जवळ आंबित गावात असणारे मुळा नदीवरील आंबित धरण ओव्हर फ्लो झाले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील यावर्षीच्या पावसाळ्यात भरणारे आंबित धरण हे जिल्ह्यातील पहिले धरण ठरले आहे. मान्सून पूर्व दमदार एन्ट्रीने अकोले तालुक्यातील हे पहिले धरण भरले आहे. घाटमाथ्यावर तसेच संपुर्ण अकोले तालुक्यात पाऊस सुरू आहे. यामुळे मुळा नदी पाणलोट क्षेत्रात मुळा नदी वाहू लागली आहे. उगमाजवळ असणाऱ्या आंबित या लघु प्रकल्पाची साठवण क्षमता 193.97 दशलक्ष घन फूट आहे.

संबंधित बातम्या