आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला असून, या मेळाव्यामध्ये येणारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला असून, या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिक्रिया घेतली. ते म्हणाले की, महानगरपालिकेवरती महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांशी बोलण्याची प्रक्रिया चालू आहे.