महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीसाठी २१०० रुपये देण्याची घोषणा केली. कर्जमाफी बाबत शेतकऱ्यांना फसवले. आमदारांच्या मारामाऱ्या सुरू आहेत. मंत्र्यांनी कसे वागावे हे सांगण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. अनेक मंत्री पैशांचे घोटाळे करत आहेत. मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मुख्यमंत्री त्यांच्यावर पांघरून घालत आहेत. अशी राज्याची दयनीय परिस्थिती असून महायुती ही सत्तेसाठी एकत्र आहे. महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू आहे. सत्तेच्या सिमेंट मुळे राज्यात महायुती सरकार टिकून असल्याची टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर केली आहे.