आजपासून मासेमारीच्या नवीन हंगामाला सुरुवात झाली आहे. म्हावऱ्याच्या ओढीने कोकण किनारपट्टी पुन्हा गजबजणार आहे. रायगड, रत्नागिरी, पालघर, मुंबई आणि सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. कोकणात पावणेचार लाख मासेमारी मच्छिमार तर १४ हजार मासेमारी नौका आहेत.
माशाच्या प्रजनन कालावधीमुळे दोन महिने मासेमारीवर बंदी घालण्यात येते. समुद्रातील वादळी परिस्थिती कायम असल्याने पूर्ण क्षमतेने मासेमारी हंगाम सुरु होण्यास निर्बंध लागतात. मच्छिमार समुद्रावर स्वार होण्यासाठी सज्ज झाले आहेत.