टाळ-मृदंगाच्या गजरात संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सिंदखेडराजात आगमन

टाळ-मृदंगाच्या गजरात संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सिंदखेडराजात आगमन
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

संत श्री गजानन महाराज यांच्या परतीच्या दिंडी सोहळ्याचे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात आगमन झाले आहे. माळ सावरगाव येथे विदर्भाच्या सीमेवर दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. हजारो भाविकांनी दर्शन घेऊन भावपूर्ण वातावरणात सहभाग नोंदवला.10 जुलै रोजी पंढरपुर येथुन परतीचा प्रवास सुरु झाल्यानंतर आज माळ सावरगाव येथे दाखल झाली. यावेळी  माळ सावरगावपासून मार्गक्रमण करताना रस्त्याच्या दुतर्फा हजारो भाविकांनी दिंडीचे दर्शन घेतले. महिलांनी रांगोळ्या काढून, फुलांची उधळण करून आणि टाळ-मृदंगाच्या गजरात पालखीचे स्वागत केले. सुमारे 700 वारकरी एकाच तालात अभंग गायन करीत चालत होते. त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी आमदार मनोज कायंदे, अॅड. नाझेर काझी, माजी नगराध्यक्ष देवीदास ठाकरे, सतीश तायडे, अतिश तायडे, उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम, पोलिस निरीक्षक आशिष इंगळे, नायब तहसीलदार प्रांजल पवार, बालाजी सानप, राहुल मेहुणकर व श्रावण डोंगरे आदींच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.

संबंधित बातम्या