वांगी येथील जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था, पालकांच्या संतप्त प्रतिक्रिया

वांगी येथील जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था, पालकांच्या संतप्त प्रतिक्रिया
  • MG News
  • जुलै 26 2025

Share on  

 बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळेमधील भेसूर वास्तव समोर आले आहे. बीडच्या वांगी येथील जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यात शाळा गळतेय आणि यामध्येच विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विद्यार्थी देखील शाळेत येण्यास टाळाटाळ करत असल्याचे पालकांनी म्हंटले आहे. तर गेल्या दोन महिन्यांपासून पालक हे शिक्षण विभागाकडे चकरा मारतात, शाळा गळतीय असे सांगतात. मात्र, याची दखल शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेने घेतली नाही, अशा प्रतिक्रिया पालक देत आहेत.
     दरम्यान, आमची मुलं या ठिकाणी येतात, वरून पाऊस पडतो आणि ते आम्हाला घरी आल्यावर सांगतात, पप्पा आमचा वर्ग गळतोय, आम्हाला कशाला पाठवता. आम्हाला इथेच शिकवा तिथं लाईट नाही, असं म्हणतात. त्यामुळे माझी पालकमंत्री अजित पवारांना एकच विनंती आहे, अजित दादा तुम्ही आमच्या वांगी गावात या. आमची शाळा पाहा, इथं मुलं कसे शिक्षण घेतात ? असं म्हणत पालकांनी थेट अजित पवार यांनाच गावात येऊन शाळा पाहण्याचं साकडं घातले आहे.
 

संबंधित बातम्या