हातखंबा गावातील एलपीजी टँकरमधील उर्वरित गॅस ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. तज्ञ टीमच्या मार्गदर्शनाखाली गॅस ट्रान्सफर केला जातोय. गॅस ट्रान्सफर होईपर्यंत महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. यावेळी क्रेनच्या साहाय्याने टँकर सरळ केला गेला. मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक सुरू होण्यासाठी आणखी तीन ते चार तास लागणार असून जिल्हा प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.