छत्रपती संभाजीनगर महिला गर्भवती राहिल्यापासून योग्य आहार न घेतल्यामुळे, तर अनेकदा बाळांना प्रमाणित आणि संतुलित आहार न दिल्यामुळे कुपोषण वाढण्याचा धोका असतो. सध्या उपासमारीमुळे नव्हे तर संतुलित पोषक आहार न मिळाल्यामुळे जिल्ह्यात ६००० बालके कुपोषित आहेत.
सध्या जिल्ह्यामध्ये तीव्र कुपोषित १०८१ बालक तर मध्यम कुपोषित ५४८ बालक आहेत. कुपोषित बालकांची शारीरिक वाढ खुंटते. प्रतिकारशक्ती कमी होते. सतत थकवा, चिडचिडेपणा जाणवतो. खूप मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव असतो, चिडचिडेपणा येतो आणि त्यांची शिकण्याची गती ही मंदावते अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी अभय धानोरकर यांनी दिली आहे.