महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पिकाला भाव मिळत नाही, पीक विमा मिळत नाही, सरकारची मदत मिळत नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. आता ही वेळ कंत्राटदारावर आली आहे. सांगलीच्या जलजीवन मिशनच्या कंत्राटदाराने काम केले. पण गेले सहा महिने सरकारने बिल थकवले म्हणून त्याने जीव दिला.
सत्ताधाऱ्यांनी सत्तेवर येण्यासाठी महाराष्ट्राला कंगाल करून ठेवले आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागात बिल थकवली आहेत, राज्यातील रस्त्यांची चाळण झाली आहे असे विजय वडेट्टीवार म्हणाले.