सत्ताधारी सापापेक्षाही विषारी; बच्चू कडू यांची सरकारवर जोरदार टीका

सत्ताधारी सापापेक्षाही विषारी; बच्चू कडू यांची सरकारवर जोरदार टीका
  • MG News
  • जुलै 30 2025

Share on  

माजी मंत्री बच्चू कडू यांनी पुसद तालुक्यातील गहुली येथे आयोजित शेतकरी आत्मचिंतन बैठकीत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. सत्तेतील लोक सापापेक्षाही विषारी आहेत. अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी सातबारा कोरा यात्रेच्या शेवटच्या दिवशी महागाव तालुक्यातील अंबोडा येथे गुन्हे दाखल झालेल्या शेतकऱ्यांचा बच्चू कडू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

भाषणात बच्चू कडू म्हणाले की, हे सरकार मण्यार जातीचे आहे, जे चावले हे लक्षातही येत नाही. त्यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा उल्लेख करत शेतकऱ्यांसाठी ते फासावर जाण्यासही तयार होते, तर आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळ कुठे आहे? असे विचारतात या दोन्ही मुख्यमंत्र्यांमधील फरक त्यांनी अधोरेखित केला.

संबंधित बातम्या