नाशिक शहरातील नागरिकांवर पाणीपट्टी वाढीची टांगती तलवार

नाशिक शहरातील नागरिकांवर पाणीपट्टी वाढीची टांगती तलवार
  • MG News
  • मे 28 2025

Share on  

नाशिक शहरातील नागरिकांना पाणी पट्टीसाठी आता जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. मनपाला पाणी पुरवठ्यासाठी जलसंपदा खात्याकडून आकरण्यात येणाऱ्या दरात 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. ही वाढ मनपा नागरिकांकडून वसूल करण्याची शक्यता असल्याने नागरिकांना पाणीपट्टीसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी नाशिक महापालिका  जलसंपदा विभागाकडून पाणी आरक्षित करून त्या बदल्यात वर्षाला सुमारे २४ कोटी रुपये पाणीपट्टी अदा करते. मात्र, जलसंपदा विभागाने यंदा नाशिक महापालिकेला पत्र देऊन त्यात दहा टक्के वाढ केली आहे. त्यामुळे महापालिकेवर वर्षाला सुमारे दोन कोटी चाळीस लाख रुपयांचा बोजा पडणार आहे. या वाढीव बोज्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांवर पाणी पट्टी वाढीची टांगती तलवार आहे.

संबंधित बातम्या