बहूप्रतीक्षित संत तुकाराम चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

बहूप्रतीक्षित संत तुकाराम चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
  • MG News
  • जुलै 2 2025

Share on  

महाराष्ट्राच्या भक्तिरसपूर्ण इतिहासातील अजरामर संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतीक्षित चित्रपट "संत तुकाराम" चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

अभिनेता सुबोध भावे यांनी संत तुकारामांची प्रमुख भूमिका साकारली असून, हिंदी चित्रपटसृष्टीतील मातब्बर कलाकार संजय मिश्रा यांचीही या चित्रपटात विशेष भूमिका आहे.

चित्रपटाचा ट्रेलर एक अध्यात्मिक अनुभव वाटतो. तुकाराम महाराजांचा भक्तीचा प्रवास, समाजातील अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि हरिपाठ, अभंगरचना यांची प्रभावी मांडणी यातून दिसून येते. चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य ओम यांनी केले असून, यामध्ये शेना चोहन, अरुण गोविल, द्विंकल कपूर यांसारख्या कलाकारांचाही समावेश आहे. या ट्रेलरमध्ये उत्कृष्ट छायाचित्रण, साजेसं पार्श्वसंगीत आणि भावनाप्रधान संवाद यामुळे प्रेक्षक भारावून गेले आहेत. संत तुकाराम हा चित्रपट 18 जुलै 2025 रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, हिंदी भाषेत तयार झालेला हा चित्रपट महाराष्ट्रातील मराठी प्रेक्षकांसाठीही एक आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे. सोशल मीडियावर ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहते आणि संत साहित्यप्रेमी यांच्याकडून प्रचंड उत्साह व्यक्त होत असून, "सुबोध भावेंचा अभिनय म्हणजे जणू संत तुकारामच अवतरले आहेत" अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

संबंधित बातम्या