वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करताना डॉक्टर हिप्पोक्रॅटिक शपथ घेतात. ही शपथ डॉक्टरांच्या व्यावसायिक जीवनातील नैतिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या दर्शवते. रुग्णाला मी त्याचा धर्म, जात वंश ,राष्ट्रीयत्व न बघता सर्वेतोपरी उपचार करेल असे नैतिक बंधन डॉक्टरला यातून घालण्यात आले आहे .मात्र याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.घटना लातूरची आहे कोरोना महामारित जेव्हा समस्त जग धास्तावले होते ,तेव्हा ऑक्सिजन कमी आहे.तरी रुग्णाला मारून टाक,असा धक्कादायक सल्ला एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरला देत असल्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मिडीयात वेगाने व्हायरल होत आहे.लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील शासकीय सामान्य रुग्णालय आणि अन्य तीन ठिकाणी कोविड सेंटर कार्यरत केली होती. त्यापैकी एका ठिकाणी दायमी गौसोद्दीन ही महिला रुग्ण दाखल होती.तीला ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात द्यावा लागत असल्याने त्यांना मारून टाक असे विधान तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे हे अन्य सहकारी डॉक्टर असलेल्या शशिकांत डांगे यांना सांगत असल्याचे सांगत असल्याचे या व्हिडीओ क्लिपमध्ये सांगण्यात आले आहे.या क्लिपची अधिकृत पुष्टी होत नसली तरी या यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येतोय.