कॉपर केबल चोरी प्रकरणी चोर अटकेत – निजामपुर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी!

कॉपर केबल चोरी प्रकरणी चोर अटकेत – निजामपुर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी!
  • MG News
  • नोव्हेंबर 8 2025

Share on  

निजामपुर पोलिस स्टेशन हद्दीतील शिवारातील पवनचक्की टॉवर क्रमांक V-33 मधून कॉपर केबल चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी निजामपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू करून चोरांना अटक करण्यात यश मिळवले आहे. अटकेत असलेले आरोपी १) कपिल वामन पवार, व २) संजय ऊर्फ संजू पंडीत पवार (रा. बुलढाणा) ३) हिम्मत उर्फ बाज्या शामा कांबळे ४) उदयसिंग उर्फ उदया मालसिंग ठाकरे अशी त्यांची नावे असून, पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला कॉपर वायरचा १७,६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कारवाई मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक सो, धुळे, मा. किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक, धुळे, मा.एस. आर. बांबळे, पोलीस अधिकारी, साक्री विभाग, पोनि श्रीराम पवार, स्थागुशा धुळे यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, सपोनि मयुर भामरे, पोउनि मधुकर सोमासे, पोउनि यशवंत भामरे, पोहेकों नागेश्वर सोनवणे, पोहेकॉ नारायण माळचे, पोहेकों रतन मोरे, पोहेकॉ प्रशांत ठाकुर, पोहेकाँ प्रदिप आखाडे, पोना खंडेराव पवार, पोकाँ प्रविण पवार, पोकॉ सागर थाटशिंगारे, पोकों परमेश्वर चव्हाण, पोकॉ गौतम अहिरे, पोकों सुनिल अहिरे, पोकों सागर कागणे यांचे पथकाने केली आहे.

निजामपुर पोलिसांच्या या चोख व वेगवान कारवाईचे स्थानिकांकडून कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या