ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही, त्यांनी...; लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला नाही; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही, त्यांनी...; लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला नाही; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
  • MG News
  • मे 29 2025

Share on  

 राज्य सरकारची गेमचेंजर योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिण योजनेसाठी निधी वळल्याचा आरोप अतिशय चुकीचा आणि खोटा आहे. अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना कळत नाही, तेच अशाप्रकारे आरोप करतात. कारण, अर्थसंकल्पाच्या नियमानुसार वैयक्तिक लाभासाठी जो निधी दिला जातो, तो आदिवासी विभागातच दाखवावा लागेल, अनुसूचित जाती व सामाजिक न्याय विभागातच तो दाखवावा लागेल. यासंदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांनीही सभागृहात खुलासा केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, या विभागांचं बजेट पावणे दोन पटींनी वाढलं आहे, कुठलाही पैसा वळवलेला नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्‍यांनी लाडकी बहिण योजनेचा निधी वळवल्याच्या आरोपावर प्रत्त्युत्तर व स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, अर्थसंकल्प ज्यांना कळत नाही त्यांनी माझ्याकडे यावं, अर्थसंकल्प कसा वाचावा हे पुस्तक मी लिहिलेला आहे, ते पुस्तक मी त्यांना देईन, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करणाऱ्यांना लगावला. 

संबंधित बातम्या