निर्जनस्थळी नेऊन १० वर्षांच्या मुलावर तीन जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील चुनाभट्टी येथे घडली आहे. पीडित मुलगा व तिघेजण एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलगा व तिघेजण एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यामुळे त्याला फसवून तिघांनी चुनाभट्टी येथील निर्जनस्थळी नेले. तेथे त्यांनी अल्पवयीन मुलावर अत्याचार केला. घटनेनंतर मुलगा परत घरी आल्यानंतर तो घाबरलेला होता. त्यानंतर त्याचे आईने विचारणा केली असता, मुलाने घडलेला प्रकार आईला सांगितला.
आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असून त्या अल्पवयीन मुलांची शनिवारी डोंगरी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर १८ वर्षीय तरुणाला याप्रकरणी अटक केली आहे. पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२), ११५ (२) व ३(५) सह पोक्सो कायदा कलम ६ व १० अंतर्गत गुन्हा दाखल केला.