भिवंडी-ठाणे मार्गावर वाहतूक कोंडी: चाकरमान्यांचे हाल

भिवंडी-ठाणे मार्गावर वाहतूक कोंडी: चाकरमान्यांचे हाल
  • MG News
  • मे 24 2025

Share on  

भिवंडी-ठाणे मार्गावर वाहतूक कोंडी: चाकरमान्यांचे हाल

                 भिवंडी-ठाणे मार्गावर ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आज संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. खारेगाव टोल नाका ते मानकोली दरम्यान सुमारे ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

या वाहतूक कोंडीमुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना, प्रवाशांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उशिरा घरी पोहोचण्याची चिंता आणि वाहनांमध्ये अडकून राहण्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून आले.

कोंडीच्या नेमक्या कारणाचे अद्याप स्पष्टपणे समोर आलेले नसले तरी काही नागरिकांनी खराब रस्त्यांची स्थिती, अकार्यक्षम वाहतूक नियंत्रण आणि वाढलेली वाहनांची संख्या याला जबाबदार धरले आहे. स्थानिक प्रशासनाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वाहतूक पोलीस घटनास्थळी उपस्थित असून, रस्त्यावरील कोंडी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या