दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर ते आनंदनगर परिसरातील शेतात हि घटना घडली असून गौराबाई नीलकंठ पाटील असं मृत झालेल्या पत्नीचे नाव तर नीलकंठ भीमराव पाटील असे फरशी घालणाऱ्या पतीचे नाव आहे. 'तू शेतात न येणारी आज कशी आली' असा जाब विचारत पतीचा पत्नी बरोबर वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात पतीने डोक्यात फरशी घालून पत्नीचा खून केला.
गौराबाई आणि नीलकंठ यांना दोन विवाहित मुलेअसून एक मुलगा बेंगलोर येथे कामाला आहे. तर दुसरा गावातच काम करतो. गौराबाई काही दिवस मुलाकडे राहत होत्या. गावाला जाण्या-येण्याच्या कारणावरून आणि सांभाळत नसल्याने पती-पत्नीत वाद होते. या घटनेनंतर विजापूर पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.