मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृषी महाविद्यालय येथे वृक्षारोपण संपन्न

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृषी महाविद्यालय येथे वृक्षारोपण संपन्न
  • MG News
  • जुलै 22 2025

Share on  

"हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र" या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत एक कोटी वृक्ष लागवडीच्या अभियानाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला.

या प्रसंगी मुख्यमंत्री यांनी स्वतः आंब्याचे झाड लावून वृक्षारोपणास सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात ४० लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमावेळी परिसरात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. पोलिस दलाच्या चोख बंदोबस्तामुळे संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला.

संबंधित बातम्या