लाडकी बहिण योजनेसाठी पुन्हा एकदा आदिवासी विकास महामंडळाचा निधी 

लाडकी बहिण योजनेसाठी पुन्हा एकदा आदिवासी विकास महामंडळाचा निधी 
  • MG News
  • मे 29 2025

Share on  

विधानसभा निवडणूकीत गेमचेंजर ठरलेली, लाडकी बहिण योजना निवडणूकी पश्चात मात्र अडचणीची ठरत आहे‌. राज्याची आर्थिक स्थिती फारसी उत्तम नसल्याने, लाडकी बहिण योजनेचे पैसे लाभार्थींना देण्यासाठी अन्य योजना, विभागाचा निधी वापरण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. यात आदिवासी विकास महामंडळ देखील सुटले नाहीये.आदिवासी विकास महामंडळाचा ३३५ कोटी ७० लाख रूपयाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला आहे‌. विशेष म्हणजे आदिवासी विकास महामंडळाचा निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळवण्याची ही तिसरी वेळ आहे.या आधी दोनदा प्रत्येकी २३५कोटी ७० लाख रुपयाचा निधी या योजनेसाठी वळवण्यात आला आहे‌ .सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसार आदिवासी विकास महामंडळाचा निधी अन्य कामासाठी वापरता येत नसताना, हा निधी वळवल्याने राज्य सरकारने आर्थिक श्वेतपत्रीका काढावी,असी मागणी विरोधक करत आहेत.

संबंधित बातम्या