त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस १ कोटी ११ लाखांची मदत

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस १ कोटी ११ लाखांची  मदत
  • MG News
  • ऑक्टोबर 25 2025

Share on  

 त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस १ कोटी ११ लाखांची उदार मदत देण्यात आल्याची माहिती विश्वस्तांच्या वतीने  देण्यात आली.  

याबाबतची अधिक माहिती देताना विश्वस्तांच्या वतीने सांगण्यात आले की महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी पूर परिस्थितीने थैमान घातलेला आहे. अतिवृष्टीमुळे पिढीत परिवारांना मदतीचा हात पोहोचवा म्हणून त्र्यंबकेश्वर देवस्थान तर्फे पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी आपले कुंभमेळा मंत्री माननीय नामदार गिरीशजी महाजन यांच्या पुढाकाराने आणि त्र्यंबकेश्वर देवस्थानचे चेअरमन जिल्हा सत्र न्यायाधीश सचिन भन्साळी यांच्या नेतृत्वाखाली त्रंबकेश्वर देवस्थानाने आज एक कोटी अकरा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला नाशिक येथे नाशिकच्या ओझर एअरपोर्ट विमानतळावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना सुपूर्द केलेला आहे. ही मदत जरी तुकडी असली तरी आज सरकारने हा जो काही जगन्नाथाचा रथ चालवला आहे, यामध्ये निश्चितच त्र्यंबकेश्वर देवस्थानची फुल ना फुलाचे पाकळी  म्हणून योगदान राहील असे विश्वस्तांच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल रु. १ कोटी ११ लाखांचा धनादेश आज या प्रसंगी कुंभमेळा मंत्री  गिरीश महाजन,  त्र्यंबकेश्वर देवस्थानचे चेअरमन व  जिल्हा सत्र न्यायाधीश सचिन भन्साळी,  देवस्थानचे सचिव तथा नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, विश्वस्त कैलास घुले, नाशिक जिल्हा भाजप  अध्यक्ष सुनील बच्छाव, भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, पुरुषोत्तम कडलक,  रुपाली भुतडा,  स्वप्नील शेलार, मनोज थेटे, डॉ. सत्यप्रिय शुक्ल, प्रदीप तुंगार, विशेष कार्य अधिकारी अमित टोकेकर, तसेच लेखापाल प्रणव पिंगळे उपस्थित होते

संबंधित बातम्या