जयसिंगपूर शहरातील वरेकर कॉलनीत मोबाईल टॉवरसाठी काढलेल्या खड्यात पडून रिदम महेंद्र राव या अडीच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता.२३) दुपारी घडली. याची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली.
वरेकर कॉलनीत चांदणे कुटुंबीयांच्या जागेवर इंडस कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. या टॉवरसाठी काढलेल्या खड्यात पाणी साचले होते. बुधवारी दुपारी अडीच वर्षाचा रिदम हा खेळत असताना खड्यात पडला. यात बुडून त्याचा मृत्यू झाला. जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला.
दरम्यान, रिदम याच्या आईचे शनिवारी ऑपरेशन असल्यामुळे त्या सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय कागदपत्र दाखवण्याकरिता गेल्या होत्या. त्या घरी दाखल झाल्यानंतर आईचा व त्यांच्या नातेवाइकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.