पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई
  • MG News
  • मे 26 2025

Share on  

काल रात्रीपासून मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे हिंदमाता सर्कल,  भायखळा, दादर,   कुर्ला आदी विविध ठिकाणी पाणी साठायला सुरवात झाली आहे.  पाणी साठायला सुरवात झाल्याने  बीएमसीचा नाला सफाईचा दावा फोल ठरल्याचे दिसून येत आहे.  पाणी तुंबल्याचा लोकसेवेवर परिणाम झाला आहे.  मध्य रेल्वेवरील सी एस. एम टी  ते भायखळा या मार्गावरील लोकसेवा पूर्णतः ठप्प पडली आहे. पनवेल या रेल्वे स्थानकावर देखील पाणी साठल्याने हार्बर मार्गावरील रेल्वेसेवेवर मोठा परिणाम झाला असून लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेवर वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे . 

संबंधित बातम्या