मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अनोखे वृक्षारोपण आंदोलन

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अनोखे वृक्षारोपण आंदोलन
  • MG News
  • जुलै 22 2025

Share on  

चंद्रपूरच्या रामबाग मैदानाजवळील जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे १०० शंभर वर्षे जुनी झाडे कापण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप उसळला आहे. प्रशासनाने जुन्या इमारतीजवळ उपलब्ध दोन एकर जागा असतानाही नवीन जागेवरच बांधकामाचा हट्ट धरला, असा आरोप रामबाग बचाव संघर्ष समितीने केला आहे.

याविरोधात २२ जुलै रोजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच, झाडं तोडलेल्या ठिकाणी वृक्षारोपण करत एक अनोखं आंदोलन करण्यात आले. झाडं तोडलेली जागा म्हणजे शंभर वर्षांचा वारसा. आम्ही याचं ठिकाणी आज वृक्षारोपण करून सरकारला शांततेत संदेश दिला असे प्रतिक्रिया रामबाग बचाव समितीचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी दिली.

प्रशासनाने रात्रीच्या अंधारात ‘पुष्पा स्टाईल’ने झाडांची कत्तल केली. ताडाच्या झाडांमुळे काहींना रोजगार होता, तोही हिरावून घेतला गेलाय. परिसरात पर्यावरणविषयक चिंता वाढताना दिसत असून प्रशासनाच्या निर्णयावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

संबंधित बातम्या