वैष्णवी वरील आरोपानंतर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पत्रकार परिषद

वैष्णवी वरील आरोपानंतर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पत्रकार परिषद
  • MG News
  • मे 29 2025

Share on  

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात न्यायालयातील सुनावणीनंतर हगवणेंच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. त्यावर मृत वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेत हगवणे यांच्या दाव्यांची पोलखोल करत त्यांच्यावर परत एकदा गंभीर आरोप केले.
  वैष्णवीला आत्महत्येपूर्वी  ५ ते६ दिवस मारहाण करण्यात आली होती, असा गंभीर आरोप कस्पटे यांनी या पत्रकार परिषदेत केला. हगवणे कुटुंबियांमुळे माझ्या मुलीचे लग्न दोन वेळा तुटले. त्यामुळे नाईलाजाने मला मुलीचे  हगवणे यांच्या मुलासोबत लग्न करावे लागले. 
 वैष्णवी मोबाईलवर कोणाशी तरी चॅटिंग करत होती, हे चॅटिंग सासरच्या व्यक्तींना सापडले होते. त्यावरून तिचा मोबाईल  त्यांनी काढून घेतला होता, या वकिलाचा दाव्यावर बोलताना  कस्पटे यांनी वकिलांना खडेबोल सुनावले. काल आरोपीचे वकील जे बोलले ते चुकीचे आहे. असे एखाद्या मुलीच्या चारित्र्यावर बोलणे, हे चुकीचे आहे. माझ्या मुलीचा बळी या प्रकरणाला  हगवणे कुटंबियाना वेगळी कलाटणी द्यायची आहे. मोबाईल चॅटिंगबाबत आम्हाला कल्पना दिली नव्हती. असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना अनिल कस्पटेंना अश्रू अनावर झाले. माझी मुलगी तर आता परत येणार नाही, पण आपल्या मृत मुलीला न्याय द्या. असं ते रडताना बोलत होते

संबंधित बातम्या