वैष्णवीचं 'ते' चॅट पकडलेलं, तिची प्रवृत्तीच...; हगवणे कुटुंबाच्या वकिलाचा कोर्टात युक्तिवाद
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पुण्यातील न्यायालयात सुनावणी सुरु आहे. हगवणे कुटुंबातील ५ जणांना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं आहे. त्यांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी या प्रकरणात युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावरच संशय घेतला आहे. वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्याची होती, असा गंभीर दावा हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केला आहेआजच्या युक्तिवादावेळी हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरच संशय घेतला. 'वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करायची. ते चॅट पकडण्यात आलं होतं. वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्याची होती,' असा गंभीर दावा वकिलांकडून करण्यात आला. नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही, असाही युक्तिवाद तिच्याकडून करण्यात आला आहे.