काच नदीत अडकलेल्या चौघांना गावकऱ्यांनी वाचवले; मेहकर तालुक्यातील घटना

काच नदीत अडकलेल्या चौघांना गावकऱ्यांनी वाचवले; मेहकर तालुक्यातील घटना
  • MG News
  • जुलै 26 2025

Share on  

बुलढाणा जिल्ह्यातून एक थरारक बातमी समोर आली आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील काच नदीला अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे अडकलेल्या चार शेतकऱ्यांना गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे जीवनदान मिळाले आहे. रामेश्वर ढोले, अनिता ढोले, छायाबाई पायघन, आणि नम्रता पायघन अशी या वाचवलेल्या व्यक्तींची नावे आहेत  मिळालेल्या माहितीनुसार, दूरवर नदी क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा अंदाज आला होता. त्यामुळे शेतातली कामे लवकर आटोपून ते ट्रॅक्टरने वेगाने घराकडे परतत होते.

मात्र, गावाकडे जाण्याचा रस्ता नदीपात्रातून असल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागला. जसा ट्रॅक्टर नदीपात्रात उतरवला, तसा अचानक पाण्याचा मोठा लोंढा आला आणि ट्रॅक्टरसह सर्वजण पुरात अडकले. यापैकी एका व्यक्तीने प्रसंगावधान दाखवत तातडीने गावात फोन करून मदतीची याचना केली. घटनेची माहिती मिळताच गावातील काही लोक तात्काळ धावून आले आणि त्यांनी अडकलेल्या चौघांना यशस्वीरित्या रेस्क्यू करत त्यांचे प्राण वाचवले. गावकऱ्यांच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या