वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपी हगवणे कुटुंबियांचे वकील विपुल दुशिंग यांनी बुधवारी अशिलाचा बचाव करताना केलेल्या युक्तीवादामुळे त्यांच्यावर समाजाचा सर्व स्तरातून टिका होत आहे.सर्वोच्च न्यायालयाचा निवाड्याचा हवाला देत, दुशिंग याने पतीने भांडणाच्या वेळी रागातून एखाद्यावेळी कानशीलात लगावली तर ती कौंटुबिक हिंसा होत नाही, असे विधान न्यायालयीन कार्यवाहीनंतर पत्रकारांना त्याविषयीची माहिती देताना केले होते. रोहिणी खडसे यांनी जी व्यक्ती विपुल दुशिंग याला चार चापट्या मारेल त्याला माझ्याकडून बक्षीस असे विधान केले होते. विजय वडेट्टीवार यांनी वकिलांनी सत्य परिस्थिती मांडली पाहिजे विपुल दुशिंग विनाकारण वैष्णवी यांचे चरित्रांवर शिंतोडे उडवत आहे,असे म्हटले आहे. या प्रकारच्या वकिलाची सनद रद्द झाली पाहिजे,असी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपी हगवणे कुटुंबियांचे वकील विपुल दुशिंग हा २०२२ साली एका न्यायालयीन दाव्याप्रकरणात विरोधी पक्षाच्या वकीलाला माराहण केल्यप्रकरणी दोषी असून ,सध्या जामिनावर बाहेर असल्याची माहितीही समोर येतीये.