वर्धा : वायगाव हळदीला लवकरच चांगली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल - पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

वर्धा : वायगाव हळदीला लवकरच चांगली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल - पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
  • MG News
  • मे 9 2025

Share on  

वर्धा : वायगाव हळदीला लवकरच चांगली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल - पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

   समुद्रपुर तालुक्यात उत्पादीत होत असलेल्या वायगाव हळदीमध्ये विशेष गुणकारी तत्व आहे. त्यामुळे या हळदीला विशेष मागणी असते. भौगोलिक नामांकन प्राप्त या हळदीला लवकरच देश आणि जागतिक पातळीवर चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल. या हळदीला ‘प्रमोट’ करण्यासाठी अपेडा, ईफिक्की सारख्या संस्थांची मदत घेऊ. शेतकऱ्यांना पॅकेजिंग, मार्केटींगचे चांगले प्रशिक्षण उपलब्ध करून देऊ, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आत्मा, अपेडा, ईफिक्की, स्मार्ट प्रकल्प आणि युनिव्हर्सल एक्सपोर्टच्यावतीने वायगाव हळदीची दुबई येथे निर्यात, विपणन व प्रसिध्दी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी वान्मथी सी, विभागीय कृषि सहसंचालक उमेश घाटगे, अपेडाचे विभागीय प्रमुख प्रशांत वाघमारे, ईफिक्कीचे अध्यक्ष युनिव्हर्सल एक्सपोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण वानखडे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॅा.नलिनी भोयर, विदर्भ नैसर्गिक उत्पादक शेतकरी कंपनीच्या संचालक शोभाताई गायधने आदी उपस्थित होते.

 डॉ.पंकज भोयर- राज्यमंत्री तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा

संबंधित बातम्या