शेतकरी संघटनेचा योद्धा : चंद्रकांत गुरव

शेतकरी संघटनेचा योद्धा : चंद्रकांत गुरव
  • MG News
  • नोव्हेंबर 1 2025

Share on  

 शेतकरी संघटनेचे जुने कार्यकर्ते शरद जोशींच्या विश्वासू कार्यकर्त्यांपैकी एक असे एक लढाऊ व संघटनानिष्ठ असे योद्धा शेतकरी चंद्रकांत गुरव यांचे आज दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. चंद्रकांत गुरव हे गेली चार वर्ष आजाराने त्रस्त होते. 1980 च्या काळात साताऱ्यातून आलेला हा शेतकरी पुत्र इंडस्ट्रियल एरिया मध्ये कंपन्यांचे शेडचे रंगकाम करण्यास सुरुवात केली.

नाशिकमध्ये शरद जोशी आल्यानंतर शेतकरी चळवळ सुरू झाली. त्या चळवळीत शेतकऱ्यांच्या प्रति असणाऱ्या निष्ठेमुळे चंद्रकांत गुरुवाणी उडी घेतली. या चळवळीमध्ये आल्यानंतर त्यांनी अति दुर्लक्षित अशा इगतपुरी तालुक्यात खेड्या खेड्यात जाऊन शेतकरी संघटनेचे काम उभे केले व वाडीवरे येथील शेतकरी आंदोलनात अग्रभागी राहून नागपंचमीच्या सणाच्या दिवशी प्रचंड मोठे आंदोलन केले. त्या आंदोलनाची समर्थ नेतृत्वही चंद्रकांत गुरव यांनी केले होते. त्यानंतर शेतकरी संघटनेच्या आदेशानुसार गुजरातमध्ये जे शेतकरी आंदोलन झाले होते, त्या आंदोलनाचे महाराष्ट्राच्या तुकडीचे नेतृत्वही चंद्रकांत गुरव यांनी केले होते. त्यावेळी साप्ताहिक ग्यानबा या साप्ताहिकात निखाऱ्यातून उभे राहिलेले शेतकरी संघटनेचे आंदोलन या नावाने चंद्रकांत गुरव यांचा एक प्रसिद्ध लेख प्रकाशित झाला होता. त्या आंदोलनाची दखल घेऊन चंद्रकांत गुरुवार शेतकरी संघटनेचे पंचप्राण शरद जोशी साहेबांनी मोठी जबाबदारी टाकली. ती जबाबदारी त्यांनी शेवटपर्यंत पार पाडली. त्यानंतर शेतकरी संघटनेने भ्रष्टाचार मुक्त दक्षता समितीची स्थापना केली. तिच्या सदस्य पदी माझ्याबरोबर चंद्रकांत गुरव यांचीही नियुक्ती झाली होती. या समितीने शेतकऱ्यांकडून भ्रष्टाचाराच्या रूपाने पैसे वसूल करून इलेक्ट्रिक मोटर यांचे कनेक्शन देणाऱ्या एम एस ई बी च्या अभियंता वाघ याच्यावर कारवाई करून शेतकऱ्यांकडून घेतलेली भ्रष्टाचाराची रक्कम वसूल केली. त्यावेळी सदर अधिकाऱ्याला टेबलवर उभे करून चंद्रकांत गुरवणे जे काम केले त्याला तोड नाही. त्यावेळी त्याची रौद्ररूप आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पाहिले. त्यांचे अर्धांगिनी स्मिताताई गुरव या महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या प्रमुख म्हणूनही काम करीत होत्या व आजतागायत त्या काम करीत आहेत. जगातले प्रसिद्ध झालेले चांदवडचे महिला अधिवेशन हे आगळेवेगळे अधिवेशन होते. त्या अधिवेशनाला देशभरातून एक लाख महिला उपस्थित होत्या. त्या अधिवेशनाच्या प्रचारासाठी चंद्रकांत गुरव पायाला भिंगरी बांधून दोन महिने संपूर्ण महाराष्ट्रात फिरत होते. असा हा कधीही मागे वळून न पाहणारा आदेशाचे पालन पालन करणारा एक योद्धा कार्यकर्ता होता. नाशकामध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या एक हक्काचा निवारा म्हणून चंद्रकांत गुरूंचे आनंद सागर बिल्डिंग मधले घर होते. या ठिकाणी अनेक आंदोलनांची रूपरेषा ठरलेली आहे.  आंदोलन कसे करावे, त्यातल्या गुप्तता सरकारला जेरीस कसे आणावे, पोलीस डिपार्टमेंटला हुलकवणी कशी द्यावी अशा अनेक प्रकारच्या योजना या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना चंद्रकांत गुरावांनी शिकवल्या होत्या. लांबून आलेल्या कार्यकर्त्याला त्याची जीवनाखानाची व राहण्याची व्यवस्था गुरव कुटुंबीयांनी आतापर्यंत केली.

महाराष्ट्रातील लढाऊ कार्यकर्त्यांपैकी चंद्रकांत गुरव हे एक आघाडीचे कार्यकर्ते होते. चंद्रकांत गुरुवार शेतकरी संघटनेचे पंचप्राण शरद जोशींनी अनेक जबाबदाऱ्या दिल्या. त्या यशस्वीपणे पार पाडण्याची किमया चंद्रकांत गुरवणी करून दाखवले. अशा या योद्धा शेतकऱ्यास शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना, नाशिक जिल्हा शेतकरी संघटना, नाशिक तालुका शेतकरी संघटना, निफाड तालुका महिला आघाडी, महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी, नाशिक जिल्हा युवा आघाडी, महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडी, नाशिक जिल्हा स्वतंत्र भारत पक्ष, महाराष्ट्र प्रदेश स्वतंत्र भारत पक्ष नाशिक जिल्हा, स्वतंत्र भारत पक्ष नाशिक तालुका या सर्व आघाड्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

 

लेखक : भानुदास ढिकले

संबंधित बातम्या