समृद्धी महामार्गामुळे शेतात पाणी शिरले; वर्दडी खुर्द शिवारातील पिकांचे नुकसान

समृद्धी महामार्गामुळे शेतात पाणी शिरले; वर्दडी खुर्द शिवारातील पिकांचे नुकसान
  • MG News
  • ऑगस्ट 1 2025

Share on  

बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या नागपूर कॉरिडॉरमधील ३१६ क्रमांकाच्या चॅनेलजवळील वर्दडी खुर्द शिवारात महामार्गाचे पाणी शेतांमध्ये घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुसरबिड गावाजवळील गट क्रमांक २३, २४ आणि २४ मधील शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकरी बाबुराव साहेबराव खंदारे आणि तेजराव आत्माराम हिवाळे यांच्या शेतामध्ये मका, सोयाबीन व भाजीपाला पिकांचे संपूर्णतः नुकसान झाले आहे.
 महामार्गाच्या कामामध्ये पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था न केल्यामुळे पावसाचे पाणी शेतात शिरल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात दोन्ही शेतकऱ्यांनी तहसीलदार, सिंदखेड राजा यांच्याकडे लेखी निवेदन दिले असून, नुकसानग्रस्त शेतजमिनीचा तात्काळ पंचनामा करण्यात यावा व योग्य ती भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या