गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाले दुथळी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील बबई गावच्या नाल्यावरील पुलावर पाणी चढल्याने २ गावाचा आपसातील संपर्क तुटला आहे. या नाल्यावरील पुलावरून दीड ते दोन फूट पाणी वाहत आहे. तर वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजच्या ७ गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू असून, पुजारीटोला आणि कालीसराड धरणांमधून देखील मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे.