बुलढाणा जिल्हा आणि अकोला जिल्ह्याला जोडणारा शेगाव जवळील मन नदीवरील पुलावरून आज सकाळी नऊ वाजेपासून पाणी वाहत असल्याने शेगाव आकोट हा राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे.
मागील आठ दिवसांपासून परिसरामध्ये पावसाने दडी मारली होती. दरम्यान, आज सकाळपासून या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी नाले एक झाले आहे. शिवाय मन नदीवर पूर आल्याने अनेक पुलावरून पाणी जात आहे. शेगाव लोहारा दरम्यान असलेल्या पुलावरून पाणी जात असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालेली आहे.