राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज पैठणच्या जायकवाडी धरणातील पाण्याचे जल पूजन करण्यात आले. सध्या पैठणचे धरण हे 90% भरलेले आहे. त्यामुळे धरणातील काही दरवाजे देखील उघडे करण्यात येणार आहेत. त्यानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज जल पूजन करण्यात आले. यावेळेस पैठणचे आमदार विलास भुमरे, गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार, घनसावंगी आमदार हिकमत उडान, वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे उपस्थित होते.