खालापूर तालुक्यातील वावोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे सध्या पूर्णतः दुर्लक्षित असल्याचे पाहायला मिळत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे इमारतीला गळती लागली आहे. विद्युत वायरी देखील उघड्यावर असल्याने शॉक लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची डागडुजी करण्याची मागणी करण्यात येत आहे. जर इमारतीची डागडुजी न केल्यास छावा संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा छावा संघटना जिल्हाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी प्रशासनाला दिला आहे.